Monday, April 2, 2018



 फोटो:- जागतिक महिला दिनानिमित्त विजेत्या विद्यार्थिनींसोबत कार्यकारी अध्यक्षा सौ.नेहाजी माने व महिला प्राध्यापक


फोटो:- जागतिक महिला दिनानिमित्त बोलताना कार्यकारी अध्यक्षा सौ.नेहाजी माने, सौ.शिल्पा मुंगळे (कथ्थक विशारद) व अॅडव्होकेट सौ.पूनम गाडगीळ(डान्सर,शियामक दावर अकादमी) व महिला विकास विभागप्रमुख प्रा.कादंबरी बागायतकर
  
  प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या "महिला विकास विभागातर्फे” दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी अध्यक्षा सौ.नेहाजी माने यांची उपस्थिती लाभली.याप्रसंगी महाविद्यालयाच्या महिला विकास विभागप्रमुख प्रा.कादंबरी बागायतकर तसेच महिला विकास विभागाच्या सदस्या प्रा. पी.पी.क्षीरसागर,प्रा.एस.आर.मांगले,प्रा.आर.टी.घाटे,विद्यार्थी प्रतिनिधी ईश्वरी नाईक व अक्षता वराडकर उपस्थित होत्या.
  याप्रसंगी महिला विकास विभागाने “रँप वॉक अँड टॅलेंट शो” स्पर्धा विद्यार्थिनींसाठी आयोजित केली होती यामध्ये महाविद्यालयातील २२ विद्यार्थिनींनी आपला उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.निकालांती विजेती म्हणून ऋतुजा नवले(बीई आयटी) हिने प्रथम,समिधा तानवडे(बीई ऑटो) हिने द्वितीय तर सायली नेवरेकर(टीई कॉम्प) हिने तृतीय क्रमांक पटकावला.या स्पर्धेचे परीक्षण सौ.शिल्पा मुंगळे (कथ्थक विशारद) व अॅडव्होकेट सौ.पूनम गाडगीळ(डान्सर,शियामक दावर अकादमी) यांनी केले.
  दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थिनींसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले गेले.यामध्ये विद्यार्थिनींच्या १० ग्रुपनी आपला सहभाग नोंदवला.विजेती म्हणून श्रद्धा कदम हिला गौरविण्यात आले. नृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.पी.एस.घुबडेपाटील व प्रा.गीतांजली सावंत यांनी काम पाहिले. ”महिला सक्षमीकरण” या विषयाअंतर्गत सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स केल्याबद्दल निकिता जाधव व ग्रुपला विशेष पुरस्कार देण्यात आला.

No comments:

Post a Comment