Monday, April 2, 2018

माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागाच्या “एक्सप्लोर 2k18” चे भव्य आयोजन!!


फोटो:- उदघाटनप्रसंगी संस्थाध्यक्ष मा.श्री.रवींद्रजी माने,कार्याध्यक्षा सौ.नेहाजी माने,उपाध्यक्ष श्री.मनोहर सुर्वे, प्राचार्य डॉ. महेश भागवत,लांजा कॉलेजच्या प्राचार्या डॉ.देऊस्कर, विभागप्रमुख प्रा. महावीर साळवी
फोटो:- यशस्वी स्पर्धकांसह व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉ.यास्मिन आक्टे, संस्थाध्यक्ष मा.श्री.रवींद्रजी माने, कार्याध्यक्षा सौ.नेहाजी माने,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत,विभागप्रमुख प्रा. महावीर साळवी इ.

  आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागातर्फे एक्सप्लोर 2k18 महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील ५०० हून अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात अॅड मॅड जुनून,मिनी मिलेशिया,बिझनेस प्लॅन, बिझनेस क्विझ,रंगोली, ट्रेझर हंट यासारख्या विविध स्पर्धांचा समावेश होता.तसेच ‘बेस्ट पेर्सोना’ हि स्पर्धा संपूर्ण महोत्सवामध्ये नाविन्यपूर्ण ठरली.
  महोत्सवाचे उदघाटन संस्थाध्यक्ष मा.श्री.रवींद्रजी माने यांच्या शुभ हस्ते व कार्याध्यक्षा सौ.नेहाजी माने,उपाध्यक्ष श्री.मनोहर सुर्वे, प्राचार्य डॉ. महेश भागवत,लांजा कॉलेजच्या प्राचार्या डॉ.देऊस्कर, विभागप्रमुख प्रा. महावीर साळवी,इतर विभागप्रमुख,प्राध्यापक व सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पडले. विभागप्रमुख प्रा. महावीर साळवी यांनी सुरुवातीला महोत्सवाचा उद्देश स्पष्ट केला.त्यानंतर प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी  महाविद्यालय व व्यवस्थापन विभागाचा अहवाल सादर केला व महाविद्यालयाच्या इतर अनेक उपक्रमांशी स्पर्धक विद्यार्थ्यांनी संलग्न राहून आपली गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन केले.
  मा.श्री.रवींद्रजी माने आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की उत्तम व्यवस्थापक व व्यावसायिक घडविण्यासाठी महाविद्यालयांनी विविध उपक्रम राबविणे काळाची गरज आहे.”एक्सप्लोर” हे भविष्यात असेच पूरक व्यासपीठ ठरावे.याच कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला पोलीसांप्रती सामाजिक बांधिलकी व त्यांच्या कार्याबद्द्ल जनजागृती व्हावी यासाठी विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी देवरुख पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांना निमंत्रित करण्यात आले होते.याप्रसंगी पोलीस निरीक्षक श्री.शिवाजी पाटील व त्यांच्या सहकार्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.स्पर्धेच्या सुरुवातीला पोलीस दलावर आधारित नृत्य व पथनाट्य सादर करण्यात आले.
  महोत्सवाच्या प्रथम दिवशी सायंकाळी विद्युत रोषणाईच्या झगमगाटात, महाविद्यालयाच्या निसर्गरम्य व भव्य प्रांगणात,टेलीव्हिजन मालिकामधील कलाकारांच्या उपस्थितीत “बेस्ट पेर्सोना” या स्पर्धेचा सोहळा रंगला.’रात्रीस खेळ चाले’फेम अभिनेत्री नम्रता पावसकर तसेच अभिनेते व एल.अॅंड.टी.फायनान्स कोल्हापूरचे मॅनेजर श्री.योगेश कुंभार यांनी स्पर्धकांचे परीक्षण केले. विद्यार्थ्यांची कला व व्यक्तिमत्त्व विकासासाठी हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
  डीबीजे कॉलेज चिपळूणची धनश्री गोंजरे हि ‘मिस एक्सप्लोर’ ठरली तर गोगटे जोगळेकर रत्नागिरी कॉलेजच्या सोहम शिंदेने ‘मिस्टर एक्सप्लोर’ चा किताब पटकावला.बेस्ट पेर्सोना” या स्पर्धेला देवरुख ठाण्याचे पोलीस,मान्यवर व महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थीनीचा प्रचंड प्रतिसाद लाभला.महोत्सवाच्या शेवटच्या सत्रामध्ये संस्थाध्यक्ष मा.श्री.रवींद्रजी माने, कार्याध्यक्षा सौ.नेहाजी माने,प्रमुख पाहुणे डॉ.यास्मिन आक्टे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेची बक्षिसे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. एक्सप्लोरची जनरल चँम्पियनशिपची ट्रॉफी लांजा येथील बी.एच.बाइंग महाविद्यालयाने पटकावली.            
 महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा.मासुमा पागारकर,प्रा.सुदर्शन जाधव,प्रा.रश्मी घाटे,प्रा.मिलिंद शिंदे,प्रशील अणेराव यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पल्ले व सुमित आंब्रे यांनी केले.तसेच महोत्सव यशस्वी होण्यासाठी व्यस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.                     

No comments:

Post a Comment