Sunday, January 21, 2018

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात 'व्हर्चुअल लॅब' कार्यशाळा संपन्न‼



फोटो:- 'व्हर्चुअल लॅब' कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. महेश भागवत,संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी माने, सहसचिव श्री.दिलीप जाधव, संगणक विभागप्रमुख प्रा. मुश्ताक गडकरी व उपस्थित मान्यवर शिक्षक


कार्यशाळेप्रसंगी मार्गदर्शन करताना संगणक विभागप्रमुख व मार्गदर्शक प्रा. मुश्ताक गडकरी 

  देवरुख: राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये  दि. १६/०१/२०१८ रोजी 'व्हर्चुअल लॅब' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.सदर कार्यशाळा अकरावी व बारावी विज्ञान विभागाला शिकवणाऱ्या प्राध्यापकांसाठी आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र याविषयांमधील प्रयोग संगणकाच्या मदतीने कसे केले जाऊ शकतात याचे प्रात्यक्षिक दाखविले गेले. या कार्यशाळेचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील ५५ शिक्षकांनी घेतला.
  व्हर्चुअल लॅबहि भारत सरकारच्या, मानव संसाधन विकास मंत्रालयाने, माहिती व संचार तंत्रज्ञानाच्या माध्यमाने शिक्षणावर राष्ट्रीय मिशन अंतर्गत सुरू केलेली एक योजना आहे. एकविसाव्या शतकात लागणारा संगणक व डिजिटल इंडिया या दोन गोष्टींवर महाविद्यालयाने भर देण्याचा प्रयत्न केला आहे.  या प्रकल्पाचा उद्देश अंडर-ग्रॅज्युएटपासून संशोधनापर्यंतच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विविध शाखांमधील प्रयोगशाळांना रिमोट अँक्सेस प्रदान करणे हे आहे. 

  राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागाचे विभागप्रमुख प्रा.मुश्ताक गडकरी व त्यांचे सहकारी प्राध्यापक यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले.राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय १९९८ पासून रत्नागिरी जिल्ह्यातील आंबव या गावात कार्यरत आहे.या महाविद्यालयाला नॅक मानांकनाची ‘बी प्लस’ हि श्रेणी ‘२.६२’ गुणांसह प्राप्त झाली आहे. तसेच या महाविद्यालयाला ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (ए.आय.सि.टी.इ),सि.आय.आय सर्व्हेमध्ये सलग दुसऱ्यांदा सुवर्णश्रेणी प्राप्त झाली आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय.एस.टी.ई) या संस्थेकडून महाराष्ट्र व गोवा विभागासाठीचा ‘बेस्ट इंजिनीअरिंग कॅम्पस’ हा अॅवॉर्ड महाविद्यालयाला नुकताच प्राप्त झाला आहे .गेल्या दोन वर्षांपासून 'व्हर्चुअल लॅब' साठी या महाविद्यालयाला भारतीय प्रोद्योगिकी संस्थान(आय.आय.टी) बॉम्बे या प्रथितयश संस्थेचे नोडल सेन्टर म्हणून मान्यता मिळाली आहे. या विषयाच्या अनेक कार्यशाळा यापूर्वीही याच महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांसाठी घेण्यात आलेल्या आहेत. आता हाच उपक्रम शिक्षकांसाठी आयोजित झाला आहे.

  अशाच प्रकारचा उपक्रम कोकणातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी व्यक्त केले.याप्रसंगी संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी माने यांचे प्रोत्साहन लाभले.

 

No comments:

Post a Comment