Sunday, May 13, 2018

माने कॉलेजच्या ५० हून अधिक विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये कॅंपस इंटरव्ह्युद्वारे निवड!!




 
 
फोटो:- नामांकित कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांसोबत संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी माने,सौ.नेहा माने, प्राचार्य डॉ.महेश भागवत,ट्रेनिंग अॅंड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.अतुल यादव तसेच प्रा.राहुल दंडगे,प्रा.महेश पावसकर व प्रा.निरंजन मंचेकर

   आंबव(देवरुख) येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील  ५० हून अधिक विद्यार्थ्यांची कॅंपस इंटरव्युमध्ये विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली.या शैक्षणिक वर्षामध्ये महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अॅंड प्लेसमेंट विभागातर्फे विविध प्रथितयश कंपन्यांच्या कॅंपस इंटरव्ह्युचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये ओरॅकल पुणे,मेक मी हॉलीडेज,ग्लोबनेट सोल्युशन्स, भिल्वारा इन्फोटेक बंगलोर, व्योम लॅब्स, डॉक्ट्रॉनिक्स, सिएमएस आयटी सर्व्हिसेस,पर्सिटस सोल्युशन्स,फिक्शनस टू फॅक्ट,बायनरी ईएल,पॅरामेट्रीक्स मुंबई,रा टेक्नोक्रॅट्झ,असाही ग्लास इंडिया प्रा.लि.,अॅक्टी सिस्टिम्स मुंबई,यश इंडस्ट्रीज,प्रोटेक सोल्युशन्स,पॉस्को,वेंकटेश ऑटोमोबाईल्स,कल्याणी टेक्नोफोर्ज,पुणे व ओइएन इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश होता.
  महाविद्यालयाच्या कॅंपसमध्ये पार पडलेल्या या मुलाखतींमध्ये अंतिम वर्ष कॉम्प्यूटर,आयटी, मेकॅनिकल,ऑटोमोबाईल तसेच इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकॉम या विभागाच्या  विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला त्यापैकी ५० हून अधिक विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली.यामध्ये कोकणातील सर्वात जास्त पॅकेज ४.२ लाख/वर्ष असे ओरॅकल या कंपनीने दिले आहे.
  विद्यार्थ्यांच्या करीअरचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन महाविद्यालयाने प्लेसमेंटसाठी मॉन्स्टर कॉलेज बरोबर करारही केला आहे. विद्यार्थ्यांची कॅंपस मुलाखतींसाठी तयारी व्हावी तसेच त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी महाविद्यालय विशेष प्रयत्न करत आहे.सिड इन्फोटेक,प्रोलिफिक तसेच गिक्स लॅब्स पुणे यासारख्या प्रथितयश संस्थांशी त्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
सिड इन्फोटेकशी केलेल्या करारांतर्गत महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना बेसिक व प्रॅक्टिकल इंग्लिश,तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना क्वांटिटेटिव अॅप्टिट्युड तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना कार्पोरेट रिक्रुटमेंट ट्रेनिंग देण्यात येते. प्रोलिफिक व गिक्स लॅब्सशी केलेल्या करारांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक असे अॅडव्हान्स्ड टेक्नोलॉजीकल ट्रेनिंग देण्यात आले.याचा विशेष फायदा कॅंपस इंटरव्युमध्ये विद्यार्थ्यांना झाला. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच सर्वांगीण विकासासाठी प्रोत्साहन दिले जाते.
  महाविद्यालयाच्या या यशामध्ये ट्रेनिंग अॅंड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.अतुल यादव तसेच प्रा.राहुल दंडगे,प्रा.पराग जोशी,प्रा.महेश पावसकर व प्रा.निरंजन मंचेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत तसेच संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी माने,सौ.नेहा माने यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.