Tuesday, November 28, 2017

माने अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांचे “एन.पी.टी.ई.एल.” परीक्षेत सुयश!



  


      
     प्रा.अनिकेत जोशी              प्रा.श्वेता बोरकर              प्रा.संदीप भंडारे

 आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय हे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय,भारतसरकार प्रायोजित  एन.पी.टी..एल. (National Program on Technology Enhanced Learning)” या परीक्षेचे केंद्र असून त्याद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रा. अनिकेत जोशी यांनी “मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट(MIC) या विषयात सुवर्णश्रेणी प्राप्त केली आहे.
  एन.पी.टी..एल.’ ही परीक्षा म्हणजे भारतातील “आयआयटी व आयआयएससी” यांसारख्या अग्रगण्य संस्थांचा संयुक्त उपक्रम आहे.याद्वारे विविध तांत्रिक विषयांवर शॉर्ट टर्म व लॉंग टर्म सर्टिफिकेट कोर्सेस घेतले जातात. आयआयटीचे तज्ञ प्राध्यापक अशा अभ्यासक्रमांसाठी मार्गदर्शन करतात.या परीक्षेत ९०% हून अधिक गुण मिळाल्यानंतर सुवर्णश्रेणी व ६०% हून अधिक गुण मिळाल्यास इलाइट श्रेणी दिली जाते.
  सदर परीक्षेत इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन विभागातील प्रा. अनिकेत जोशी यांनी ९४% गुण मिळवून ही ‘सुवर्णश्रेणी’ प्राप्त केली आहे.याच विभागाच्या प्रा.श्वेता बोरकर यांनीही ‘बेसिक इलेक्ट्रीकल सर्किट(BEC)’ या विषयात ‘उत्तीर्ण’ असे प्रमाणपत्र मिळवले आहे.तसेच प्रा.अनिकेत जोशी व प्रा.संदीप भंडारे यांनी अनुक्रमे “बेसिक बिल्डींग ब्लॉक्स ऑफ मायक्रोवेव्ह इंजिनिअरींग (BBBME)” व “मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट(MIC)” या विषयांमध्ये ६७% व ६५% गुण मिळवत इलाइट श्रेणी प्राप्त केली आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी अशा परीक्षांमध्ये नेहमीच सहभागी होऊन आपले ज्ञानसंवर्धन करतात.
  सदर प्राध्यापकांचे संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी माने,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत तसेच इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा. अजित तातुगडे आदींनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment