Wednesday, October 25, 2017

माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम‼



  मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून त्यामध्ये आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
  या वर्षी महाविद्यालयाच्या ऑटोमोबाईल विभागातून रुपेश अवसरे हा विद्यार्थी 8.१८ (CGPA) गुण मिळवून विशेष प्राविण्यासह महाविद्यालयात प्रथम  आला. अभिषेक सुतार व प्रसाद नलावडे ह्या विद्यार्थ्यांनी  ७.६२(CGPA)  आणि ७.५५ (CGPA)  गुण मिळवून अनुक्रमे दुसरा व तिसरा   क्रमांक पटकावला. ऑटोमोबाईल विभागाचा निकाल ९८.७७% लागला.
  माहिती तंत्रज्ञान या शाखेचा महाविद्यालाचा निकाल १००% लागला असून अमोल भागवत हा 8.७३(CGPA) गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम आला. रोमा अहिरे आणि विशाखा बाबरदेसाई ह्यांनी अनुक्रमे 8.५६(CGPA)  व ७.७२(CGPA)  गुण मिळवून दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. संगणक विभागाचा निकाल ९१.१८% लागला असून सायली लोगडे, दीपिका देवरुखकर आणि संकेत गडदे हे अनुक्रमे 8.३४, 8.१९, 8.०३(CGPA) गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
  अणुविद्युत व दूरसंचार विभागाचा निकाल ८१.०८ % लागला असून श्रद्धा शिंदे,ऋतुजा भुर्के व अश्विनी भट हे अनुक्रमे 8.२३, 8.१३ व ७.९५ (CGPA)  गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.एमएमएस विभागाचा निकाल ८६.६७ % लागला असून मसूमा पागरकर,रोहन खामकर,क्रांती सावंत हे अनुक्रमे ६.७६, ६.६८  व ६.४४ (CGPA)  गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.
  यांत्रिकी विभागाचा निकाल ८२.०९% लागला असून अजय पाटील,सिद्धार्थ गुरव आणि प्रथमेश शिर्के हे अनुक्रमे 8.८०, 8.४१ व ७.९० (CGPA) गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयातील सर्व विभागांमधून एकूण ३२३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी १८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ८१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री.रवींद्र माने, कार्याध्यक्षा सौ.नेहा माने, उपाध्यक्ष श्री.मनोहर सुर्वे, सचिव श्री. चंद्रकांत यादव, सहसचिव श्री.दिलीप जाधव, प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच परीक्षा विभाग प्रमुख प्रा. विश्वनाथ जोशी व सर्व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.






No comments:

Post a Comment