Wednesday, October 25, 2017

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एमएमएस विभागाला शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील वरिष्ठ मान्यवरांची भेट !!

फोटो:- बैठकी दरम्यान उपस्थित शैक्षणिक व  औद्योगिक क्षेत्रातील वरिष्ठ मान्यवर व एमएमएस विभागाचा प्राध्यापक वर्ग
  राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एमएमएस विभागाला शैक्षणिक व  औद्योगिक क्षेत्रातील वरिष्ठ मान्यवरांनी नुकतीच भेट दिली. विभागाच्या भविष्यातील वाटचालीसाठी व गुणवत्ता वाढीसाठी पूरक शैक्षणिक वातावरण व धोरणात्मक बदलांकरीता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
  सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर विभागप्रमुख प्रा. महावीर साळवी यांनी विभागातील चालू घडामोडी व विभागातील आतापर्यंतच्या कामकाजाचा आलेख मान्यवरांना सादर केला.या बैठकीमध्ये बोलताना श्री.एस.एच.केळकर कॉलेज ऑफ आर्टस,कॉमर्स अॅंड सायन्स कॉलेज देवगडचे प्राचार्य डॉ.श्री.जी.टी.परुळेकर यांनी मार्गदर्शन केले.तसेच गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरीच्या प्राचार्या व अर्थशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ.यस्मिन आवटे यांनी विभागामध्ये विद्यार्थ्यांना अधिकाधिक ACTIVITY BASED LEARNING (ABL) अंतर्गत व्यवस्थापनाचे शिक्षण देण्यात यावे असे सूचित केले. याप्रसंगी आयडीबीआय बँक साखरपा शाखेचे व्यवस्थापक मां.श्री.जितेंद्रकुमार यांनी IIM  व इतर उच्च दर्जाच्या व्यवस्थापनातील कॉलेजेसना भेट देऊन आपल्या गुणवत्तेत कशा प्रकारे वाढ करता येईल ते आत्मसात करून तसे धोरण राबवावे असे सुचविले.
  यावेळी बोलताना श्री.एस.एच.केळकर कॉलेजचे बीएमएस विभागप्रमुख श्री.बाळकृष्ण तेऊरवाडकर यांनी व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये कोणता बदल होणे आवश्यक आहे यावर विशेष भर दिला.याप्रसंगी विभागप्रमुख व प्राध्यापक वर्ग यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकास व व्यवस्थापन शिक्षणाच्या अनुषंगाने येणाऱ्या सुचवलेल्या  सर्व गोष्टी राबविण्याची हमी दिली. एमएमएस विभागाच्या सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये या सर्व मान्यवरांनी वरीलप्रमाणे मार्गदर्शन केले.हे सर्व मान्यवर एमएमएस विभागाच्या डिपार्टमेंट अॅडव्हायझरी बोर्ड समितीचे सभासद आहेत. उपस्थित सर्व मान्यवरांनी संपूर्ण विभागाची प्रवेश क्षमता परिपूर्ण केल्याबद्द्ल विशेष कौतुक केले व सध्या चालत असलेल्या घडामोडींवर व राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांवर समाधान व्यक्त केले.
  अशा बैठका वरचेवर आयोजित करण्यात याव्यात व त्यावर सकारात्मक चर्चा व्हावी व त्याअनुशंगाने बदल करण्यात यावेत जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विकासात्मक बदल होईल व विद्यार्थी तो अंगीकृत करतील असे महाविद्यालयाचे चेअरमन श्री. रवींद्र माने यांनी सांगितले.तसेच हा उपक्रम कौतुकास्पद असलेचे त्यांनी नमूद केले.या बैठकीकरता विभागप्रमुख प्रा. महावीर साळवी व प्राध्यापक वर्ग यांनी आभार व्यक्त केले.


No comments:

Post a Comment