Wednesday, April 12, 2017

राजेंद्र माने महाविद्यालयाचा (RMCET) सुवर्ण श्रेणीमध्ये समावेश ‼

  आंबव येथील  प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (RMCET) ‘सुवर्ण’ श्रेणीमध्ये समावेश झाल्यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई),नवी दिल्ली व कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालये व त्यांची औद्योगिक जगताबरोबर असणारी संलग्नता याविषयी सर्व्हे (आढावा) घेण्यात आला.या सर्व्हेमध्ये भाग घेण्यासाठी मे २०१६ ते ऑगस्ट २०१६ या दरम्यान एआयसीटीईच्या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. २०१६ वर्षासाठी संपूर्ण भारतातून १८२९ अभियांत्रिकी संस्थांनी या सर्व्हेसाठी नाव नोंदणी केली परंतु ८९० संस्थांनीच यशस्वीरीत्या सर्व माहिती भरून सहभाग नोंदवला.
  या सर्व्हेमध्ये ६ वेगवेगळ्या परिमाणाद्वारे महाविद्यालयाचे औद्योगिक विश्वाशी असणारे संबंध तपासण्यात आले.यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींचा महाविद्यालयातील विविध समित्यांमधील सहभाग, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांचा औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रकल्प,मार्गदर्शन, औद्योगिक प्रशिक्षण, औद्योगिक सहल यासारख्या प्रकारामध्ये सहभाग, विद्यार्थ्यांचे नोकरी लागण्याचे अथवा स्वत:चा व्यवसाय चालू करण्याचे प्रमाण, महाविद्यालयातील उपलब्ध सुविधा अशा अनेक परिमाणांचा समावेश होता.सहभागी झालेल्या ८९० संस्थांना प्लॅटीनम,गोल्ड व सिल्वर या तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आले.
  राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय हे कोकणातील एकमेव महाविद्यालय सुवर्ण(गोल्ड) श्रेणींमध्ये मानांकन मिळवण्यात यशस्वी झाले आहे. राजेंद्र माने महाविद्यालयाने औद्योगिक जगताबरोबर परस्पर संबंध वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. महाविद्यालयातील प्रत्येक विभागाच्या शैक्षणिक सल्लागार समितीमध्ये उद्योग क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला आहे. विविध नामांकित उद्योगसमूहांमधील तज्ञ व्यक्तींना प्रगत व आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल विद्यार्थ्याना माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करून त्यात मार्गदर्शनासाठी बोलावले जाते.तृतीय वर्षाची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर किमान दोन आठवड्याचे औद्योगिक प्रशिक्षण अनिवार्य करण्याचा निर्णय महाविद्यालयाने आमलात आणला आहे.शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या मुलांचे प्रकल्प हे जास्तीतजास्त औद्योगिक क्षेत्राशी संबंधित असण्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्याना औद्योगिक क्षेत्राची तोंडओळख व्हावी यासाठी विविध नामांकित
उद्योगसमूहांमध्ये शैक्षणिक सहली आयोजित केल्या जातात.

  या सर्वांमुळे यावर्षी पहिल्यांदाच या सर्व्हेमध्ये सहभागी होऊनही  महाविद्यालयाने ‘सुवर्ण’ श्रेणीमध्ये स्थान मिळविले आहे. या सर्व्हेमध्ये सहभागी होण्यासाठी महाविद्यालयातील इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरअॅक्शन सेलचे प्रमुख प्रा. राहुल दंडगे व सदस्य प्रा.विकास मोरे, प्रा.इसाक शिकलगार, प्रा. सुमित सुर्वे व प्रा. स्नेहल मांगले यांनी परिश्रम घेतले. यासाठी लागणारी सर्व माहिती उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बहुमोल सहकार्य केले. महाविद्यालयाचे अध्यक्ष मा.श्री. रवींद्रजी माने, कार्याध्यक्षा सौ.नेहा माने व प्राचार्य डॉ. महेश भागवत यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन यामुळेच या सर्व्हेत यशस्वीरीत्या सहभागी होता आले अशा भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आल्या. 

No comments:

Post a Comment