Friday, March 3, 2017

माझ्या मराठीची बोलू कौतुके परि अमृतातेही पैंजा जिंके”

  


  मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील “ग्रंथालय विभाग व मराठी भाषा साहित्य मंडळ “ यांच्या संयुक्तविद्यमाने ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.
  मराठी भाषेला मोठा वारसा मिळाला आहे.मराठी भाषेचे अस्तित्व टिकविण्यासाठी मराठी भाषेचा वापर होणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने  आपल्या वाढदिवसानिमित व विशेषतः महिलांनी हळदी कुंकू निमित्त एकतरी पुस्तक विकत घेवून प्रथम ते वाचा व आपल्या जवळच्या वाचनालयास भेट द्या म्हणजे वाचनसंस्कृती टिकवीण्यास मदत होईल, असे  मत कार्यक्रमाचे पाहुणे डॉ. सुरेश जोशी यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमात त्यांनी कुसुमाग्रज यांच्या “ विशाखा काव्यसंग्रहातील  “ कोलंबस गर्वगीत “ या कवितेचे वाचन केले व कवितेतील आशय विषद केला.
  मराठी भाषा टिकविण्यासाठी सर्वांनी मराठीचे वाचन केले पाहिजे,भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी मराठी भाषेचे योगदान महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे  ज्येष्ठ कवी ,लेखक यांच्या लेखनाविषयी संस्थेचे चेअरमन मा. रवींद्र माने यांनी आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमानिमित्त ग्रंथालयातर्फे मराठी पुस्तकांचे एक दिवसीय ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले . मुलांच्या साहित्याला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी “लक्षवेध” नावाच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले ,यावेळी संस्थेच्या सदस्या जान्हवी माने उपस्थित होत्या .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी श्रेया पालकर यांनी केले . ग्रंथालय प्रमुख प्रा. जितेंद्र खैरनार यांनी कुसुमाग्रज यांच्या साहित्याची ओळख करून दिली. प्राचार्य डॉ. महेश भागवत व ग्रंथालय प्रमुख प्रा. जितेंद्र खैरनार यांनी  विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त ग्रंथालयाचा वापर करावा , रोज एक तास तरी मराठी वाड्मयाचे वाचन व वर्तमानपत्रातील लेखांचे वाचन करावे यासंदर्भात मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचा समारोप प्रा. सुदर्शन जाधव यांनी केला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथालय समिती व मराठी भाषा साहित्य मंडळ यातील सभासद यांनी विशेष मेहनत घेतली .



No comments:

Post a Comment