Wednesday, April 6, 2016

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “क्लाउड कॉम्प्युटिंग” विषयावर कार्यशाळा संपन्न!!


देवरुख: राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी विभागामध्ये “दोन दिवसांची क्लाउड कॉम्प्युटिंगवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.उद्घाटन सोहळ्यासाठी व्यासपीठावर नवी दिल्ली येथील गिक्स लॅबचे तज्ञ प्रशिक्षक श्री. मिथीलेश पांडे यांचेसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत,विभागप्रमुख प्रा. लक्ष्मण नाईक, समन्वयक प्रा.विकास मोरे,सह समन्वयक प्रा.मनिष प्रभू उपस्थित होते.
   कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रा.विकास मोरे यांनी कार्यशाळेची उपयुक्तता विषद केली. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी गिक्स लॅब बरोबर महाविद्यालयाने केलेल्या सामंजस्य कराराची माहिती देऊन विद्यार्थ्यांना या नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
  लोकल सर्व्हर किंवा वैयक्तिक संगणकामध्ये माहितीचा साठा, संकलन किंवा प्रक्रिया करण्यापेक्षा याच गोष्टी क्लाउड कॉम्प्युटिंगद्वारे इन्टरनेटच्या महाजालामध्ये स्थापित रिमोट सर्व्हरच्या माध्यमातून करता येऊ शकतात.या संदर्भातील अशा सुविधा पुरवणारे प्रोव्हायडरस्,त्यांची इत्यंभूत माहिती या कार्याशाळेमध्ये  देण्यात आली.
  या कार्याशाळेचा लाभ द्वितीय व तृतीय वर्षाच्या ३६ विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारे नवीन तंत्रज्ञानावर आधारित वेगवेगळ्या कार्यशाळांचे आयोजन महाविद्यालयातर्फे नेहमीच करण्यात येते.

   हि कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी  प्रा.विकास मोरे, प्रा.मनिष प्रभू,प्रा. मंगेश गोसावी,संकेत गडदे,संतोष पाटील यांचे सहकार्य लाभले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.विकास मोरे यांनी केले.

No comments:

Post a Comment