Thursday, March 10, 2016

PCB workshop for EXTC Department

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात पिसीबी डिझाईनिंग वर कार्यशाळा संपन्न !!

  देवरुख : आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  अणुविद्युत व दूरसंचार विभागातर्फे पिसीबी डिझाईनिंग” या विषयांतर्गत नुकतीच दोन दिवसांची कार्यशाळा संपन्न झाली. हि कार्यशाळा द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली व त्याला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. एकूण ५3 विद्यार्थ्यांनी सदर कार्यशाळेचा लाभ घेतला.  
    या कार्याशाळेला कु.मेघानी कळसूलकर व कु.सायली राणे (एस्.एस्.ओ.आय.झेड. प्रा.लि.,पुणे) या तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. हि कार्यशाळा “पिसीबी डिझाईनिंग” विषयाचे सखोल ज्ञान,त्याची व्याप्ती विद्यार्थ्यांना समजावी तसेच त्याविषयीच्या कौशल्याची त्यांना माहिती व्हावी या उद्देशाने आयोजित केली होती.
  या कार्याशाळेमध्ये ‘प्रोटीस’ या सॉफ्टवेअर माध्यमाद्वारे विविध सर्किट्स बनवण्यावर भर देण्यात आला. यामध्ये पॉवर सप्लाय, फ्रिक्वेन्सी मीटर, डिसी मोटर इ. सर्किट्स विद्यार्थ्यांनी वरील साधनाचा प्रत्यक्ष वापर करून डिझाईन केली.
  कार्यशाळेच्या सुरुवातीला समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे यांनी तज्ञांची ओळख करून दिली. तसेच  याप्रसंगी विभागप्रमुख प्रा.अडूरे सर यांनी कार्यशाळेचा उद्देश विषद केला. हि कार्यशाळा संपन्न होण्यासाठी प्राचार्य डॉ. महेश भागवत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विभागप्रमुख प्रा. सुनिल अडूरे, समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे व अन्य शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment