Thursday, March 24, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गेट परीक्षेत सुयश !!



राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गेट परीक्षेत सुयश !!
 भरत देवरुखकर               दिगंबर मोहिते                मनोज ढेबे                ओंकार गोमले
 

 



सुभाषचंद्र जोशी                     झिलू राणे                      अभय गावडे
 आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी व संगणक विभागाच्या सात विद्यार्थ्यांनी तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक यांनी २०१६ च्या अभियांत्रिकी गेट परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवले. अभियांत्रिकीमधल्या उच्च शिक्षणाकरीता प्रवेश परीक्षा म्हणून दरवर्षी गेट परीक्षा आयोजित करण्यात येते. अभियांत्रिकीमधिल उच्च काठीण्य पातळी असलेल्या या परीक्षेसाठी देशभरातून अभियांत्रिकीचे विद्यार्थी आपले ज्ञानकौशल्य आजमावतात.
 या वर्षी झालेल्या या परीक्षेमध्ये  माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रा. एस.एस. कोळेकर, यांत्रिकी विभागातून भरत देवरुखकर,ओंकार गोमले,मनोज ढेबे,दिगंबर मोहिते तसेच संगणक विभागातून झिलू राणे, सुभाषचंद्र जोशी व अभय गावडे या  विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले.
 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी
‘गेट फोरम’ स्थापन करण्यात आले होते. या गेट फोरमच्या  मार्गदर्शनाचा उपरोक्त विद्यार्थ्यांना फायदा झाला.या परीक्षेतील उज्वल यशाबद्दल संस्था अध्यक्ष श्री.रवींद्रजी माने यांनी कौतुक व्यक्त करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
 या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी आनंद व्यक्त करून भविष्यातही महाविद्यालयामध्ये गेट फोरम सारखे उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. यांत्रिकी विभागप्रमुख
प्रा. श्री. संजय भंडारी, संगणक विभागप्रमुख प्रा. लक्ष्मण नाईक  यांचे प्रोत्साहन व गेट फोरमचे
प्रा. श्री.शैलेश खांडेकर व प्रा.जी.एन.सावंत यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.



No comments:

Post a Comment