Wednesday, March 23, 2016

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “सिंटीला 2k16” संपन्न!!



माने अभियांत्रिकी महाविद्यालयात सिंटीला 2k16 संपन्न!!
 
फोटो:- उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर उजवीकडून अनुक्रमे प्रा.सुनिल आडुरे,गद्रे कन्सल्टंसी प्रा. लि. पुणे चे श्री.मकरंद        गद्रे,संस्थाध्यक्ष श्री.रवींद्र माने, गद्रे इन्फोटेक रत्नागिरीचे श्री.वैभव गोगटे,प्राचार्य डॉ.महेश भागवत,प्रा.अजित तातुगडे



  प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच राष्ट्रीय स्तरावरील सिंटीला 2k16 या तांत्रिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.या आयोजनामध्ये अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाने महाविद्यालयातील इतर विभागांच्या सहकार्याने मोलाचा वाटा उचलला.
  सदर महोत्सवाचे उद्घाटन गद्रे कन्सल्टंसी प्रा. लि. पुणे चे प्रोप्रा.श्री. मकरंद गद्रे यांच्या हस्ते , गद्रे इन्फोटेक रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.वैभव गोगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच संस्थाध्यक्ष श्री.रवींद्रजी माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत, विभागप्रमुख व समन्वयक प्रा.सुनिल आडुरे,सहसमन्वयक प्रा.अजित तातुगडे व विद्यार्थी समन्वयक अक्षय बावकर उपस्थित होते.
  सर्वप्रथम प्रा.आडुरे यांनी प्रास्ताविक करताना सिंटीला 2k16 अंतर्गत पार पाडल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांची माहिती दिली. याप्रसंगी प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी प्रमुख पाहुणे व सहभागी स्पर्धकांचे स्वागत करून महोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला.उद्घाटक श्री. मकरंद गद्रे यांनी मायक्रोसॉफ्ट या प्रथितयश कंपनीमध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचेबरोबर २१ वर्षे काम केले आहे.तसेच एम.एस.एक्सेल हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी येणाऱ्या अडचणींवर मात करून समस्यांची उकल करण्याची मानसिकता जोपासण्याची गरज व्यक्त केली तसेच त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये नव्याने येऊ घातलेल्या 


 

No comments:

Post a Comment