Friday, November 6, 2015

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांचे ‘एल अॅंण्ड टी इन्फोटेक’ च्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये नेत्रदीपक यश !!











झिलू राणे       अभय गावडे      सुभाषचंद्र जोशी     पॉल फर्नांडीस
आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील माहिती तंत्रज्ञान व संगणक शाखेच्या चार विद्यार्थ्यांची ‘एल अॅंण्ड टी इन्फोटेक’ या आय टी क्षेत्रातील कंपनीने नोकरीसाठी निवड केली आहे.
   रत्नागिरी येथील फिनोलेक्स अॅकॅडमीने अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आय टी क्षेत्रातील नोकरीची संधी मिळावी यासाठी ‘एल अॅंण्ड टी इन्फोटेक’ ची मेगा भरती आयोजित केली होती.यामध्ये रत्नागिरी ,सिंधुदुर्ग व रायगड मधील पाचशे  विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभागातील सुभाषचंद्र जोशी,झिलू राणे व अभय गावडे तसेच माहिती तंत्रज्ञान विभागातील पॉल फर्नांडीस या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले.त्यांची या कंपनीने ट्रेनी. इंजिनीअर म्हणून निवड केली आहे.
   कंपनीच्या निवड प्रक्रियेमध्ये अॅप्टीट्युड टेस्ट,ग्रुप डिस्कशन,पॅराग्राफ रायटिंग,टेक्निकल इंटरव्ह्यू व एच आर इंटरव्ह्यू अशा प्रकारच्या पायऱ्या होत्या.महाविद्यालयाच्या  या चार विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया यशस्वीपणे पार करून यश मिळवले.सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. अतुल यादव यांचे सहकार्य लाभले.
   विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्था अध्यक्ष व माजी पालकमंत्री श्री.रवींद्रजी माने, कार्याध्यक्षा सौ.नेहा माने,प्राचार्य डॉ. महेश भागवत व सर्व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले.