Thursday, October 8, 2015

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रसिद्धी सप्ताह साजरा






फोटो : राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा.राहुल बेळेकर, प्रा.गुरुप्रसाद बुर्शे व विद्यार्थी




  प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाचे औचित्य साधून प्रसिद्धी सप्ताहचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाअंतर्गत एक  आठवड्याच्या कालावधीत विविध उपक्रम राबवण्यात आले.यामध्ये सर्वप्रथम ‘राष्ट्रीय सेवा योजना दिवस’ साजरा करण्यात आला.त्यानंतर रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांमध्ये एच.आय.व्ही.संक्रमणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने देवरुख ग्रामीण रुग्णालयातील विद्या माने व वैशाली पुजारी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
   या सप्ताहाअंतर्गतच २ ऑक्टोबर रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छता अभियान’ राबवण्यात आले.त्याचबरोबर महाविद्यालयात युवतींसाठी स्व-संरक्षणाची जाणीव निर्माण होण्यासाठी प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर प्रात्यक्षिकांसाठी देवरुख येथील श्री.शशांक घडशी यांनी मार्गदर्शन केले.
   राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह यशस्वी होण्यासाठी संस्थाध्याक्ष मा.श्री.रविंद्र माने यांच्या प्रेरणेने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या प्रोत्साहनाने, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा.राहुल बेळेकर,प्रा.गुरुप्रसाद बुर्शे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.कादंबरी बागायतकर, प्रा.राहुल पोवार, सौरभ तांबे व सत्यजित सपकाळ  यांनी मोलाची भूमिका निभावली.

No comments:

Post a Comment