Saturday, August 29, 2015

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या “टीम फुल थ्रोटल” ची नोएडा ‘गो कार्टिंग’ स्पर्धेसाठी निवड

फेब्रुवारी २०१६ मध्ये होणाऱ्या नोएडा गो कार्टिंग स्पर्धेसाठी आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील “टीम फुल थ्रोटल ची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.नोएडा दिल्ली स्थित ‘इंडियन सोसायटी फॉर न्यु एरा इंजिनियर्स’ या संस्थेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून “बुद्ध इंटरनॅशनल सर्किट नोएडा” येथील आंतरराष्ट्रीय फोर्मुला रेसिंगच्या ट्रॅकवर ही स्पर्धा होणार आहे.
  या स्पर्धेच्या निवड प्रक्रियेअंतर्गत २३ ऑगस्ट रोजी इंदौर येथे ‘गो कार्ट डिझाईन चॅलेंज’ हि उपांत्य फेरी पार पडली.या फेरीअंतर्गत नोंदणीकृत २०० संघांमधून उपांत्य फेरीसाठी देशभरातून १०० संघ निवडण्यात आले होते.या उपांत्य फेरीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला त्यानुसार या  महाविद्यालयाच्या “टीम फुल थ्रोटल ने पाचवा क्रमांक पटकावला.या उपांत्य फेरीमध्ये सहभागी संघाची डिझाईन प्रेसेंटेशन,कॉस्ट रिपोर्ट,प्रोजेक्ट प्लॅन आदी निकषांवर तयारी आजमावण्यात आली.यामध्ये “टीम फुल थ्रोटल कॉस्ट रिपोर्ट या निकषामध्ये सर्वोत्तम ठरली.अॅक्रोपोलीस टेक्निकल कॅम्पस इंदौर येथे उल्लेखनीय यश संपादन केलेल्या या टीममध्ये महाविद्यालयातील मयूर राऊळ,सिमरनजीत सिंग,कौशल हलवाई,प्रतिक कसाळकर,आदित्य पवार,अनिकेत तांबे व पुष्पराज पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.शिक्षक सल्लागार म्हणून प्रा.सुमित सुर्वे यांनी मार्गदर्शन केले.
  या संदर्भात बोलताना सिमरनजीत सिंग याने सांगितले की राष्ट्रीय स्तरावर पाचवा क्रमांक मिळाल्यामुळे संघासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे.संस्थाध्याक्ष श्री.रविंद्र माने यांची प्रेरणा,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांचे प्रोत्साहन,विभागप्रमुख प्रा. निमेष ढोले व प्रा.एस.आर.भंडारी  यांचे सहकार्य,शिक्षक सल्लागार प्रा.सुमित सुर्वे यांचे मोलाचे मार्गदर्शन यामुळेच हे यश संपादन करणे शक्य झाले. महाविद्यालयातर्फे सदर “टीम फुल थ्रोटल ला नोएडा स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 


No comments:

Post a Comment